इस्रायलने तत्काळ युद्धावर बंदी घालावी : मुस्लीम मंचचे राष्ट्रपतींना निवेदन
भुसावळ : प्लास्टिन-इस्रायलने गाझावर सुरू केलेल्या युद्धात लहान मुले, महिला, वृद्ध आणि नागरी भागातील नागरीकांचा बळी जात आहे. पाणी, वीजपुरवठा, इंधन, औषध पुरवठा, अन्नपुरवठा बंद पडल्याने जे जिवंत आहेत ते उपासमारीने मरत आहेत. मुस्लीम मंच भुसावळच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन भारताने तत्काळ युद्धविराम आणि मस्जिद-ए-अक्सा या इस्रायलच्या अनधिकृत ताब्यातून मुक्त करण्यासाठी संयुक्त राष्ट्र परीषदेत आवाज उठवावा, अशी मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या नावे निवेदन देवून करण्यात आली.
यांचा शिष्टमंडळात समावेश
शिष्टमंडळात मौलाना हकीम साहब, साबीर मेंबर, हाजी सलीम पिंजारी, साजीद बागवान, युनोस मामा, मुजाहिद शेख, शकीर पिंजारी, निसार मेहताब शेख, अकबर शेख आदींची उपस्थिती होती.










