कंत्राटी भरतीला स्थगिती : महाविकास आघाडीचा सोयगावात निषेध
सोयगाव : महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश काढून या अध्यादेशाचे खापर महायुतीच्या सरकारवर फोडत राजकारण केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शनिवारी सोयगावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात तीव्र शब्दात भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला
भाजपाची दोन तास निदर्शने
यावेळी भाजपाच्या पदाधिकार्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन तास निदर्शने करून घोषणाबाजी केली
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष बद्री राठोड, माजी नगराध्यक्ष कैलास काळे, संजीवन सोनवणे, मयूर मनगटे, सुनील ठोंबरे, योगेश पाटील, ईश्वर शिरसागर, प्रदीप चव्हाण, मुन्ना ढगे, समाधान आगे, विशाल गिरी, संजय पाटील, अनिस तडवी, राजू पोटदुखे, नारायण राठोड, रूपचंद पवार, बाळू तात्या, धनसिंग राठोड, पप्पू राठोड, शेखर ठाकरे, ईस्माईल पटेल, पूनमचंद चव्हाण, भिवा चव्हाण, अनुप तडवी, धनसिंग परदेशी, अरुण काळे व सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.










