बेकायदा गावठी दारू विक्री भोवली : सांगवीतील महिला स्थानबद्ध
Illegal Village Liquor Sale Bhovali : Women of Sangvi arrested चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील सांगवी येथील महिलेविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली. याबाबतचे आदेश नुकतेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी काढले. बेकायदा गावठी दारू विक्री केल्याप्रकरणी महिलेविरोधात तब्बल आठ गुन्हे दाखल होते तर दोन वेळा प्रतिबंधक कारवाई केल्यानंतर महिलेच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने महिलेला स्थानबद्ध करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आक्काबाई सुरेश चव्हाण (40, सांगवी, ता.चाळीसगाव) असे स्थानबद्ध झालेल्या महिलेचे नाव आहे.
सातत्याने गुन्हे : वर्तणुकीत नाही सुधारणा
ग्रामीण भागात अवैध गावठी हातभट्टीच्या माध्यमातून सातत्याने दारू विक्री करणार्या आक्काबाई चव्हाणविरोधात आतापर्यंत तब्बल आठ वेळत्त गुन्हे दाखल करण्यात आले तर दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई झाली मात्र महिलेच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पोलिस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार व ग्रामीण पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचार्यांनी महिलेविरोधात प्रस्ताव सादर केला होता. जिल्हाधिकार्यांनी प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर महिलेला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर महिलेची अकोला येथील मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले.


जिल्ह्यात दुसरी कारवाई
महिलेविरोधात करण्यात आलेली ही चाळीसगाव तालुक्यातील पहिली तर जळगाव जिल्ह्यातील दुसरी कार्यवाही आहे. यापूर्वीची कारवाई रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील महिलेवर करवाई करण्यात आली.
