नवसाला पावणारी मनुदेवी : आठव्या माळसाठी भाविकांची गर्दी


नवसाला पावणारी मनुदेवी ; आठव्या माळसाठी भाविकांची उसळली गर्दी

सोयगाव ः बोरमाळ तांडा घाटाच्या पायथ्याशी असलेली मनुदेवी नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रोत्सवात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. रविवारी आठव्या माळसाठी या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली. उत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मनुदेवीचे मंदीर हे घनदाट जंगलात व निसर्गरम्य वातावरणात आहे. या ठिकाणी आल्यावर मन शांत होते शिवाय बोललेल नवस पूर्ण होत असल्याने नवस फेडण्यासाठी येथे गर्दी होते. नवसाला पावणारी मनुदेवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या तीर्थस्थळावर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटद्वारे या मंदीरावर जावे लागते. या तीर्थस्थळाचा विकास व्हावा, अशी मागणी परीसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

बोरमाळ तांडा गावापासून काही अंतरावर मनुदेवीचे जागृत देवस्थान असुन मनुदेवीचा परीसर हा डोंगराच्या व्ही.आकाराचा असुन येथे दिवसाच्या बारा वाजेला सुर्याचे दर्शन होते तर तीन वाजता सूर्य मावळतांना दिसतो. परीसरात आजुबाजुला सागाचे घनदाट झाडे असून मंदीराच्या अगदी समोर जवळपास तीनशे फुटावरुन कोसळणारा धबधबा आकर्षक आहे. येथून एका नदीचा उगम झाला असून त्या नदीस मनुबाई नावाने ओळखले जाते. सोनार समाजाची कुलदैवत असुन नवरात्रोत्सवादरम्यान सोनार मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात परंतु ह्या तिर्थस्थळावर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने भक्तांना घनदाट जंगलातून पायपीट करावी लागते. दरवर्षी बोरमाळ तांडा येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ह्या मदीरापर्यत रस्ता तयार करण्यात येतो परंतु परीसरात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दरवर्षी हा रस्ता वाहुन जातो.

मंदिरावर जाण्यासाठी शासनाने पक्का रस्ता करावा तसेच दोन ठिकाणी नळकांडी पुल बांधण्यात यावे व ह्या स्थळास तिर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा अशी मागणी सदाशिव राठोड, साहेबराव चव्हाण, हिराालाल चव्हाण, अजमल राठोड, राजाराम राठोड, धनसिंग पवार, कारभारी दागोंडे, हरी कोलते, गलचंद राठोड, सदाशिव राठोड, विलास कोलते ,नारायण खिल्लारे, सलतान चव्हाण
आदी ग्रामस्थांनी केली आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !