साकेगावानजीक कारचे टायर फुटल्याने चार वर्षीय बालकाचा मृत्यू : आव्हाणेतील चालकाविरोधात गुन्हा
Four-year-old boy dies after car tire bursts near Sakegaon : Case filed against driver भुसावळ : चारचाकी ईको वाहनाचे टायर खराब असल्याचे माहित असतानाही वाहन हळू न चालवता भरधाव वेगात सांगितल्यानंतर टायर फुटल्याने कार उलटल्याची घटना साकेगाव शिवारातील बालाजी पेट्रोल पंपाजवळ 25 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता घडली होती. या घटनेत चार वर्षीय लकी समाधान भोई (4, आव्हाणे, ता.चाळीसगाव) याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी इको कार चालक चंद्रभान शिवाजी ढोले (भोई, रा.आव्हाणे, ता.जळगाव) याच्याविरोधात गुुन्हा दाखल करण्यात आला.
वेगात वाहन चालवल्याने फुटले टायर
समाधान चंद्रभान भोई (32) हे आपल्या परीवारासह जळगाव तालुक्यातील आव्हाने गावात वास्तव्याला आहे. 26 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजता समाधान भोई हे त्यांचा मुलगा लकी भोई आणि चालक चंद्रभान शिवाजी भोई असे सर्वजण कार क्रमांक (एम.एच.03 बी.डब्ल्यू.4861) ने कामानिमित्त जळगावहून भुसावळकडे निघाले होते.


वाहनाचे टायर खराब असल्याने वाहन चालकाला वाहन हळू चालव, अशी सूचना भोई यांनी केली होती मात्र चाक चंद्रभान भोई यांनी सूचनेकडे दुर्लक्ष करीत वाहन भरधाव चालवल्याने भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील बालाजी पेट्रोल पंपासमोर टायर फुटल्याने कार पलटी होवून मोठा अपघात झाला. यात चार वर्षाचा बालक लकी भोई याचा जागीच मृत्यू झाला तर चालक चंद्रभान भोई आणि समाधान भोई हे जखमी झाले. बालकाच्या मृत्यू प्रकरणी अखेर तीन महिन्यानंतर शनिवार, 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात चालक चंद्रभान भोई याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार संजय भोई करीत आहे.
