प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे रावेरमध्ये 8 रोजी व्याख्यान


रावेर : शिव जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी व्यायामशाळेतर्फे इतिहासाचे अभ्यासक, लेखक, व प्रेरणादायी वक्ते प्रा.नितीन बानगुडे पाटील (रहिमतपूर, सातारा) यांचे 8 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सात वाजेला छत्रपती शिवाजी व्यायामशाळा शिवाजी चौकात जाहीर व्याख्यान होणार आहे. प्रायोजकत्व श्रीराम प्लास्टिक एरीगेशन व ठिंबक सिंचन हे असून श्रीराम फौंडेशन आणि माउली फौंडेशन यांचे सहकार्य लाभणार आहे. प्रा.पाटील हे गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेतात शिवाय ते जगातील सर्वात कमी वयाचे महानाट्यकार आहेत. त्यांनी आजपर्यंतत रौद्र (संभाजी महाराजांच्या जीवनावरील कादंबरी), शंभूराजे (महानाट्य), काही जनातल काही मनातलं आदी पुस्तके लिहिली आहे. रावेर शहरातील युवकांना मार्गदर्शक ठरणारेख असे व्याख्यान होणार असून लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम पाटील व छत्रपती शिवाजी व्यायाम शाळेच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !