चोरटे शिरजोर ; जळगावात एकाच रात्री तीन घरफोड्या


जळगाव- पोलिसांच्या गस्तीला भेदत एकाच रात्री चोरट्यांनी तीन बंद घरांना टार्गेट करीत दागिणे, रोकड तसेच कपडे मिळून लाखोंच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना शुकवारी सकाळी प्रजापत नगरात घडली. प्रजापत नगरातील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस मुख्य रस्त्यालगत निरज दिलीप व्यास हे पत्नी मुले, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्यास आहे. रक्षाबंधननिमित्ताने निरज व्यास यांची पत्नी कविता या शिवाजी नगरात माहेरी गेल्या तर दोघेही भाऊ शेतीकामासाठी धानोरा गेले होते. प्रजापत नगरात चोरी झाल्याचे कळाल्यामुळे निरज व्यास यांनी फोनवरुन त्यांची वहिनी सोनाली यांना प्रकार कळविला. सोनाली यांनी तत्काळ घर गाठले असता मुख्य लोखंडी गेट कुलूप बंद तर आतील लाकडी दरवाजा कोयंडा कापलेला व दरवाजा उघडा दिसला. घरात कपाट उघडे तर सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. चोरीची खात्री झाल्यावर दोघा भावंडांनी जळगाव गाठले. लहान मुले, महिलांचे 10 ग्रॅम सोन्याचे दागिणे, 20 हजार रुपये रोख असा 30 ते 40 हजार रुपयांचा ऐवज चेरीला गेला.

एकाच परीसरात तीन घरफोड्या
व्यास यांचे घर फोडल्यानंतर चोरट्यांनी 50 मीटरच्या अंतरावरील शंकरलाल गंगाराम ओझा यांचे घर लक्ष केले. ते त्यांची पत्नी राजश्री समवेत राजस्थान राज्यातील मूळ गावी गेले होते. घरमालकाच्या माहितीनुसार ओझा दाम्पत्य शनिवारी सकाळी शहरात दाखल झाले. ओझा यांचेही घराचा कोयंडा कापून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन 15 ते 20 हजार रुपयांची रोकड लांबविली. बलदेवभाई पटेल हे मुळ गुजरात राज्यातील असून त्यांनी प्रजापतनगरात स्वत:चे घर घेतले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पटेल दाम्पत्य घराला कुलूप लावून गुजरातला रवाना झाले आहेत. या कुलूपबंद घरालाही चोरट्यांनी लक्ष्य करून कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. पटेल यांच्या घरातून काय चोरीस गेले याची माहिती कळू शकली नाही.


कॉपी करू नका.