दोधवदच्या महिलेचा कारच्या धडकेने मृत्यू
Dodhwad woman dies after being hit by a car अमळनेर : भरधाव कारने दुचाकीला उडवल्याने अपघातात दोधवद येथील महिलेचा मृत्यू झाला तर मुलगा गंभीर जखमी झाला. हा अपघात अमळगावनजीक रविवारी सकाळी नऊ वाजता घडला. याप्रकरणी अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. बेबीबाई उत्तम भोई (51, दोधवद, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे.
विरूद्ध दिशेने धडकली कार
अमळनेर तालुक्यातील दोधवद येथील भूषण उत्त्तम मोरे (भोई) हा तरूण आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. रविवार, 22 ऑक्टोबर रोजी भूषण भोई हा त्याची आई बेबीबाई भोई यांच्यासोबत दुचाकी (क्रमांक एम.एच.19 डी.एक्स.9476) ने अमळगाव येथे जात असतांना समोरून चुकीच्या मार्गाने येणारी कार क्रमांक (एम.एच.18 ए.जे.2046) कारने जोरदार धडक दिली. या धडकेत बेबीबाई यांचा जागीच मृत्यू झाला तर भूषण हा जखमी झाला. त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी राहुल भिकन भोई यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक विजय चुडामण धोबी (अमळगाव, ता.अमळनेर) याच्या विरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विजय भाई करीत आहे.


