कम्फर्ट फाउंडेशन व ललवाणी फाउंडेशनच्या सहकार्याने भुसावळ शहरातील दे.ना भोळे महाविद्यालयाला पुस्तके भेट


भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला कम्फर्ट फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने शेरील गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांची, विविध प्रकारची, ज्ञानार्जन करण्यासाठी जवळपास 225 पुस्तके भेट देण्यात आली. हा पुस्तकांचा संच ललवाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने प्राचार्य डॉ.आर. पी. फालक यांना प्रा.डॉ.डी.एम ललवाणी यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला

विद्यार्थ्यांच्या संशोधनाला पुस्तकांमुळे वाव : प्राचार्य फालक
भेट मिळालेली पुस्तके अमूल्य असून यामुळे विद्यार्थ्यांच्या वाचनाला व त्यांच्या प्रतिभेला व संशोधनाला वाव मिळणार असल्याचे प्राचार्य फालक म्हणाले. भुसावळातील ललवाणी फाउंडेशन ही संस्था सुद्धा प्रा.डॉॅ. डी.एम. ललवाणी यांच्या संकल्पनेतून गेल्या तीन वर्षांपासून विविध उपक्रम राबवीत आहे. गतवर्षीच ललवाणी फौंडेशनने महाविद्यालयाला पुस्तके भेट दिली होती, असेही प्राचार्य म्हणाले. प्रा.ललवाणी म्हणाले की, भोळे महाविद्यालयाने अल्पावधीतच चांगली प्रगती केली आहे.

निरनिराळे उपक्रम प्राचार्य फालक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविले जातात व प्राध्यापक वर्ग सुध्दा अभ्यासू, मेहनती व शिक्षणाप्रती आवड असणारा आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून मी या महाविद्यालयाच्या प्रगतीचा साक्षीदार आहे. महाविद्यालयाने व शेरील गायकवाड यांनी सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ललवाणी यांनी आभार मानले.
यावेळी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.डी. चौधरी, प्रा.दीपक जायस्वाल, प्रा.डॉ.जे.पी.सरोदे, प्रा.एस.एस.धर्माधिकारी, प्रा. डॉ.ए.के.पाटील, प्रा.गायत्री नेमाडे आदी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !