भुसावळातील तरुणीचा विनयभंग ; फोटो व्हायरलचीही धमकी
The molestation of a girl in Bhusawal ; Threat of photo viral भुसावळ : शहरातील एका भागातील तरुणीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या भावी पतीसह कुटूंबाला देवून तरुणीची बदनामी करण्यात आली तसेच तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देणार्या त्रिकुटाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
तिघा तरुणांविरोधात गुन्हा दाखल
20 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनुसार, तिचे शहरातील एका भागातील तरुणीचे लग्न ठरल्यानंतर संशयित तरुणासह त्याच्या मित्राने तरुणीच्या भावी पतीला जावून तरुणीच्या असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती दिली तसेच तरुणीसह तिच्या प्रियकराचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकीही देत तिचा पाठलाग केला. याप्रकरणी पीडीत तरुणीने शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यानंतर तिघांविरोधात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक उपनिरीक्षक इकबाल अली सैय्यद करीत आहेत.

