जळगाव रेल्वे स्थानकावरून सुरतकडे जाणार्या गाड्यांच्या प्लॅटफार्ममध्ये बदल
भुसावळ : जळगाव स्टेशनवरून पश्चिम रेल्वे लाईनवरील सुरतकडे जाणार्या प्रवासी गाड्यांच्या प्लॅटफार्ममध्ये बदल केला आहे. त्यात 20930 बनारस-उधना सुपर फास्ट एक्सप्रेस, 19052 मुजफ्फरपूर-बलसाड एक्सप्रेस, 15067 गोरखपूर-बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस, 22968 प्रयागराज-अहमदाबाद एक्सप्रेस, 19046 छपरा-सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस, 22948 भागलपूर-सुरत ताप्तीगंगा एक्सप्रेस, 13425 मालदा टाऊन-सुरत एक्सप्रेस आता प्लॅटफार्म क्रमांक पाचवरून धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.








