भुसावळ तालुक्यातील चार ग्रामपंचायतीच्या सात जागा बिनविरोध
सदस्य पदासाठी 167 तर सरपंच पदासाठी 28 उमेदवार रींगणात
Seven seats of four gram panchayats in Bhusawal taluka are uncontested भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीत बुधवारी माघारीच्या अंतीम दिवशी सदस्य पदांसाठीच्या 30 उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक रींगणात 167 उमेदवार आहेत. सात ग्रामपंचायतींमध्ये सात जागा बिनविरोध निवडून आल्या तर सरपंच पदासाठीच्या अर्जांमध्ये 13 उमेदवारांनी माघार घेतल्याने 28 उमेदवार रींगणात आहे. अंजनसोंडे चार, सुनसगाव, फुलगाव व गोजोरा येथील प्रत्येकी एक अशा सात जागा माघारींनतर एकमेव अर्ज राहिल्याने बिनविरोध झाल्या आहेत.
167 उमेदवार रींगणात
भुसावळ तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी निवडणूक तर तीन ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक होत आहे. बुधवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी सदस्य पदासाठी 30 अर्जांची माघार झाल्याने 167 उमेदवार रींगणात आहेत. सरपंच पदावरील एकही जागा बिनविरोध झाली नाही मात्र सदस्यांच्या सात जागा बिनविरोध झाल्या. सुनसगाव ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी वराडसीम जोगरखोरीत चार, सुनसगावमध्ये सात, चोरवडमध्ये तीन, विल्हाळे दोन, अंजनसोंडेत तीन, फुलगावमध्ये पाच, गोजोरे चार असे एकूण 28 उमेदवार रींगणात आहे. सर्वाधिक सरपंच पदाचे उमेदवार सुनसगाव येथे तर वेल्हाळे ग्रामपंचायतीत भाजप व राष्ट्रवादी पक्षातील उमेदवारांमध्ये सरळ लढत रंगणार आहे.

माघारीनंतर चिन्ह वाटप
निवडणूक अर्जांच्या माघारीनंतर रींगणातील उमेदवारांना चिन्ह वितरण करण्यात आले. उमेदवारांची अंतीम यादी जाहिर करण्यात आली. गावागावांमध्ये आता राजकिय वातावरण तापले आहे. भुसावळ तालुक्यातील फुलगाव, सुनसगाव, वेल्हाळे व अंजनसोंडा येथील निवडणूक चूरशीची ठरणार आहे.
पोटनिवडणुकीत सरळ लढत
भुसावळ तालुक्यातील शिंदी, हतनूर व मांडवेदिगर ग्रापंचायतीमध्ये पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. शिंदीत दोन्ही जागांवरील उमेदवार बिनविरोध झाले तर हतनूर व मांडवेदिगर येथे प्रत्येकी एका जागेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. या दोन्ही गावांमध्ये सरळ लढत रंगणार आहे.









