यावल शहरासह नऊ गावात दुर्गोत्सव विसर्जन शांततेत
Durgotsav immersion in nine villages including Yaval city in peace यावल : शहर व यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध नऊ गावांमध्ये सार्वजनिक व खाजगी अशा 106 दुर्गोत्सव मंडळांनी शांततापूर्वक विसर्जन केले. सायंकाळनंतर विर्सजन मिरवणुकीला सुरूवात झाली. रात्री 10 वाजेनंतर वाजंत्रीला परवानगी नसल्याने सर्वच मंडळांनी नियम पाळत उत्साहात दुर्गोत्सव विसर्जन आटोपले. सर्वच ठिकाणी यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. उर्वरीत काही गावांमध्ये आता शुक्रवारी विसर्जन केले जाणार आहे.
पोलिसांनी राखला चोख बंदोबस्त
यावल शहरासह यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध नऊ गावांमध्ये नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. गुरूवारी यावल शहरासह नऊ गावातील सार्वजनिक व खाजगी एकूण 106 दुर्गात्सव मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. वाजंत्रीकरीता सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहा वाजेची वेळ मर्यादा निश्चित केली. या निर्धारीत वेळेत यावल शहरासह सर्व गावातील दुर्गोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत आई दुर्गेला निरोप दिला. यावल शहरात शांतता समितीच्या सदस्यांनी मशिदीजवळ थांबून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत केले होते. मोठ्या उत्साहात यावल शहर आणि पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नऊ गावात दुर्गोत्सव विसर्जन पार पडले. विसर्जन शांततेत व्हावे याकरीता फैजपूर डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, प्रांताधिकारी कैलास कडलग, पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.










