कठोर्यात ट्रॅक्टरच्या धडकेने प्रौढाचा मृत्यू
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील कठोरा खुर्द येथे ट्रॅक्टरखाली येऊन 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 26 रोजी सकाळी घडली. वरणगाव पोलिसात ट्रॅक्टर चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा
कठोरा गावात गंगाराम भास्कर पाटील (58) हे घरासमोरून जात असताना ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 ई.ए.4043) वरील चालक संकेत अनिल पाटील याने ट्रॅक्टर अविचाराने चालवत गंगाराम यांना मागून धडक दिल्याने गंगाराम पाटील यांचा मृत्यू झाला. अपघातप्रकरणी संजय भास्कर पाटील (49, कठोरा खुर्द) यांनी वरणगाव पोलिसात फिर्याद दिल्यावरून संकेत अनिल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

