यावलला टेलर व्यावसायीकाच्या दुकानाची तोडफोड करून दोघांना मारहाण
Two were beaten up after vandalizing the shop of a tailor in Yaval यावल : शहरातील बुरूज चौकात नगीना मशिदीजवळ असलेल्या एका टेलर व्यावसायीकाच्या दुकानाची काही जणांनी तोडफोड करीत दोघांना मारहाण केली. यात दोघांना दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्या दोघांना यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचाराकरिता आणण्यात आले असून यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलवण्यात आले आहे.
मारहाणीत एकाची प्रकृती गंभीर
यावल शहरातील बुरूज चौकाजवळील नगीना मस्जीद समोरील फ्रेंड्स टेलर या व्यावसायीकाच्या दुकानात गावातीलच काही जणांनी येऊन त्यांच्या दुकानाची तोडफोड केली व नासधुस केली. सलाउद्दीन अमिनोद्दीन तसेच बाहोद्यीन अमिनोद्यीन या दोघांना त्यांनी मारहाण केली. यात दोघे जण जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरीचारीका प्रियतमा पाटील, संजय जेधे आदींनी दोघांवर उपचार केले. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आहे. याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

