कोळन्हावी येथे 42 वर्षीय महिलेला मारहाण करीत विनयभंग ; दुचाकींची तोडफोड
A 42-year-old woman was beaten and molested in Kolnhavi; Vandalism of bikes यावल : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावातील 42 वर्षीय महिलेला जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी महिलेला घराबाहेर ओढत मारहाण केली तसेच अश्लील शिविगाळ करीत महिलेचा विनयभंग केला व मोटरसायकलची तोडफोड केली. याप्रकरणी यावल पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण करीत दुचाकीची तोडफोड
कोळन्हावी, ता.यावल या गावातील रहिवासी 42 वर्षीय महिलेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून जगदीश शालिक सोळंके व शालिक नागराज सोळंके (दोघे रा.कोळन्हावी) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घरात येऊन तिला अश्लील शिवीगाळ केली व घरातून ओढून बाहेर नेले तसेच या महिलेच्या दोन मुलांना त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान केले आणि या महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी यावल पोलिसात दोघांविरुद्ध विनयभंगा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.

