यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी कोळी महासंघातर्फे उद्या अकलूदजवळ रास्तारोको आंदोलन


यावल : यावल तालुक्यातील अकलूदजवळ भुसावळ शहराकडे जाणार्‍या रस्त्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी कोळी महासंघाकडून रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. जळगाव येथील आदिवासी कोळी महासंघाकडून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रास्ता रोको आंदोलन होणार आहे. अकलूद, ता.यावल येथे भुसावळ शहरात जाणार्‍या रस्त्यावरील टोल नाक्याजवळ शनिवारी सकाळी 11 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय यावल व रावेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनी घेतला. याबाबतचे निवेदन देखील फैजपूर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना देण्यात आले.

पाठिंबा देण्यासाठी आंदोलन
रास्तारोको आंदोलन हे जळगाव येथील आदिवासी कोळी महासंघाकडून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी करण्यात येत आहे. आदिवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळावे याकरीता समाज आता रस्त्यावर उतरत आहे. या आंदोलनात समाजाचे विविध गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, महिला, शाळेचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !