भुसावळ शहरात दुचाकी चोरीचे सत्र कायम : शाळेजवळून लांबवली दुचाकी
Two-wheeler theft session continues in Bhusawal City : Two-wheeler recovered from near school भुसावळ : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून वाढत्या चोर्यांमुळे दुचाकी धारकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील भिलाई क्लासेस, भगीरथ शाळेजवळून चोरट्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 27 रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
पराग विनायक चव्हाण (23, डिगंबर नगर, जामनेर रोड, भुसावळ) यांनी त्यांच्या मालकिची 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.सी.3832) ही शहरातील भगीरथ शाळेजवळील मल्हार हॉटेल शेजारी लावली होती मात्र चोरट्यांनी काही वेळातच संधी साधली. ही घटना शुक्रवार, 27 रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आली. याप्रकरणी चव्हाण यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार सुनील बारकू जोशी करीत आहेत.

