भुसावळात रोजगार मेळाव्यात 25 उमेदवारांना मिळाले नियुक्तीपत्र
25 candidates got appointment letter in employment fair in Bhusawal भुसावळ : केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार शनिवार, 28 रोजी भुसावळ मंडळात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी यावेळी 26 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आले. नियुक्ती मिळाल्याने निवड झालेल्या सर्व उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रेल्वे भरती पारदर्शक : उमेदवारांचा विश्वास
सर्व उमेदवारांनी रेल्वेचे आभार व्यक्त करत रेल्वेतील भरती प्रक्रिया वेळेवर आणि पारदर्शकतेने पार पडल्याचे सांगितले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास अतिरीक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन), सुनील कुमार सुमन, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.एस.काझी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे यांनी केले. सर्व कल्याण निरीक्षक, कार्मिक विभाग, भरती विभाग, एस.टी.विभाग, विद्युत विभाग आणि अभियांत्रिकी विभाग यांनी सहकार्य केले.










