जळगाव जिल्हा मुस्लीम मंचच्या जिल्हाध्यक्षपदी भुसावळातील माजी नगरसेवक साबीर शेख यांची निवड
भुसावळ : शहरातील सामाजिक कार्यकर्ते व माजी नगरसेवक साबीर शेख यांची जळगाव जिल्हा मुस्लीम मंचच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी साबीर शेख यांनी कार्यकारीणी जाहीर केली. त्यात सलीम पिंजारी मेंबर (भुसावळ), अमजद पठाण (जळगाव), अल्लाउद्दीन शेख (चाळीसगाव), हकीम आर.चौधरी (मुक्ताईनगर), असलम नबी मेंबर (यावल), कुर्बान शेख मेंबर (फैजपूर), अयूब रशीद बागवान (पाचोरा), नावेद शेख (अमळनेर), ईरफान मेंबर (चिनावल), हमीद शेख ईकबाल (रावेर). समाज हितासाठी आगामी काळातही कार्य करणार असल्याचे साबीर शेख म्हणाले.










