बायको सोडून गेल्याच्या वादातून सांगवी खुर्दच्या वृद्धावर हल्ला


Sangvi Khurd’s old man was attacked over a dispute over his wife’s desertion यावल : यावल तालुक्यातील सांगवी खुर्द गावातील 61 वर्षीय वृद्धावर गावातील एका वृद्धाने वाद घालत तुझ्यामुळे माझी पत्नी मला सोडून माहेरी गेल्याचे म्हणत विळ्याने हल्ला केला. याप्रकरणी यावल पोलिसात वयोवृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला पोलिसांनी अटक केली.

पत्नी माहेरी गेल्याच्या वादातून केला हल्ला
सांगवी खुर्द, ता.यावल येथील रहिवासी पंडित शामराव धनगर (61) यांच्यासोबत गावातीलच धनराज एकनाथ बावस्कर-धनगर या वृद्धाने गावातील चौकात वाद घातला व तुझ्यामुळे माझी बायको मला सोडून माहेरी निघून गेली, असे सांगत त्यांच्यावर थेट विळ्याने हल्ला चढवला. यात पंडित धनगर यांच्या डाव्या हाताच्या बाजूला जबर दुखापत झाली. घटनेनंतर जखमी अवस्थेत पंडित धनगर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी यावल पोलिसात अर्चना तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धनराज बाऊस्कर-धनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !