भुसावळात मॉर्निंग वॉकला निघालेल्या प्रौढाला ट्रकने चिरडले


An adult who was going for a morning walk in Bhusawal was crushed by a truck भुसावळ  : मॉर्निंग वॉकला निघालेल्या प्रौढाला भरधाव ट्रकने चिरडल्याची संतापजनक घटना मंगळवारी सकाळी महामार्गावरील एसएसडी ऑटो पार्ट दुकानासमोर घडली. या अपघातात अशोक बरखतमल बजाज (50, रा.सिंधी कॉलनी, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेने बजाज यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला तर हे दृश्य पाहून अनेकांचे मन हळहळले.

अपघातानंतर ट्रक चालक पसार
अपघातानंतर ट्रक चालकासह क्लीनरने धूम ठोकली. मंगळवारी सकाळी नित्य नियमाप्रमाणे अशोक बरखतमल बजाज हे पायी फिरण्यासाठी निघाल्यानंतर भरधाव ट्रकने (एमएच 18 बीजी 6834) ने त्यांना पाठीमागून धडक दिली. ट्रामा केअर सेंटरमध्ये मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले व सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात ट्रक चालकाविरुध्द जगदीश गुलाबराव नागदेव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.



दरम्यान, महामार्गावरील अंडरपासचा प्रश्न सुटत नसल्याने अपघातांची मालिका कायम आहे. लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !