भुसावळात रॅली, प्रतिमा पूजनातून लोहपुरूषांना अभिवादन

भुसावळात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम : महिलांची शहरातून प्रथमच एकता रॅली


भुसावळ : दूरदर्शी राजनेता तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त शहर व परीसरातील विविध संस्था, संघटना, पक्षांतर्फे विविध कार्यक्रमातून अभिवादन करण्यात आले. शहरात प्रथमच महिलांची विशाल एकता रॅली काढण्यात आली.

भाजपातर्फे लोहपुरूषांना अभिवादन
भुसावळ :
जुना सातारा परीसरातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयघोषाने संपूर्ण परीसर दणाणला. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, राजेंद्र आवटे, प्रा.दिनेश राठी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, मुकेश पाटील, गुणवंत बोरोले, प्रवीण इखणकर, शहर सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, लक्ष्मण सोयंके, शंकर शेळके, शैलेजा पाटील, अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल, गिरीष पाटील, किरण सरोदे, अनिकेत पाटील, कैलास झोपे, विलास अवचार, संजय बोचरे, प्रमोद पाटील, धीरज पाटील, सुमित बर्‍हाटे, गोकुळ बाविस्कर, जयप्रकाश शुक्ला, भावेश चौधरी, सागर चौधरी, राहुल तायडे, चेतन बोरोले, श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, नंदकिशोर बडगुजर, गोपीसिंह राजपूत, रहेमान शेख, चेतन शर्मा आदींची उपस्थिती होती.

भुसावळात महिलांच्या रॅलीने वेधले लक्ष
भुसावळ :
सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिनाचे औचित्य साधून लेवा स्त्री जागर ग्रुपच्या वतीने महिलांची भव्य मानवंदना रॅली मंगळवारी काढण्यात आली. सुमारे 300 महिलांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रॅलीला भुसावळ हायस्कूलपासून सुरूवात होवून रॅली जुना सातारा भागातून सरदार वल्लभभाई पुतळ्यापर्यंत आल्यानंतर लेवा स्त्री जागरच्या गु्रपच्या वतीने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. रॅलीचे आयोजन प्रा.डॉ.सीमा देवेंद्र पाटील व प्रीती मुकेश पाटील यांनी केले.

दे.ना.भोळे महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ :
दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. याप्रसंगी प्रा.डॉ.किरण वारके, प्रा.डॉ.अमृत खडपे, प्रा.डॉ.ए.के.राऊत, प्रा.डॉ.आर.डी.वाघ, प्रा.डॉ.उज्वला गावीत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.एन.एस.वानखेडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी तसेच प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी उपस्थित होते.

नाहाटा महाविद्यालय, भुसावळ
भुसावळ :
भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.एस.व्ही.पाटील व उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एस.नाडेकर यांनी राष्ट्रीय एकता दिनाची शपथ घेतली. उपप्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे, डॉ.गौरी पाटील, डॉ.आर.एस.नाडेकर, डॉ.डी.एम.टेकाडे, प्रा.भूपेंद्र बाणाईत, प्रा.हर्षल पाटील, डॉ. स्वाती फालक, डॉ.उमेश फेगडे, डॉ.सचिन कोलते, प्रा.पौर्णिमा पाटील, किशोर नारखेडे, विनय चौधरी, प्रा.अर्चना भालेराव, प्रा.तेजल वारके, प्रा.नयना चौधरी यासह इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर
फैजपूर :
धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त तर माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांना स्मृती दिवसानिमित्त आदरांजली वाहून अभिवादन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ए.आय.भंगाळे, उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी राष्ट्रीय एकात्मता दिवसाच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी उपस्थित मान्यवर व स्वयंसेवकांना दिली. यशस्वीतेसाठी सहा.कार्यक्रम अधिकारी प्रा.शेरसिंग पाडवी, लेफ्टनंट डॉ.राजेंद्र राजपूत, कैलास चंदनशिव, रासेयो विद्यार्थिनी प्रतिनिधी रोहिणी माळी यांनी परीश्रम घेतले.

मुक्ताईनगरात खासदारांनी केले पूजन
मुक्ताईनगर :
शहरातील प्रवर्तन चौकात भारताच्या एकता व अखंडतेचे प्रतीक, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुर्जर नवयुवक मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून सरदार पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. सचिन पाटील, जितेंद्र पाटील, श्रीकांत पाटील, योगेश पाटील, सोपान पाटील, निलेश पाटील, डॉ.अमोल महाजन, डॉ.आशिष पाटील, रहस्य महाजन, प्रतीक महाजन, मोहन महाजन, सागर पाटील, पंकज कोळी, किशोर माळी, अजय तळेले उपस्थित होते.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !