अमृत कलश राष्ट्रीय संयोजक राजेश पांडे यांच्याकडे सुपूर्द
भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारत भर मेरी माटी मेरा देश या उपक्रमातून भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यातील जमविलेली माती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, जिल्हा संयोजक तथा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे यांनी मेरी माती मेरा देश अभियानाचे राष्ट्रीय संयोजक राजेश पांडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी जळगाव जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते स्पेशल ट्रेनने रवाना झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल जावळे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात मेरी माती मेरा देश हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात बुथर्यंत राबविण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश चिटणीस भैरवी वाघ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रोहित निकम, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, रमाशंकर दुबे, वरणगाव शहराध्यक्ष सुनील महाजन, गोलू राणे, दिलीप कोळी, राहुल जंजाळे, हिंदू मुस्लिम अंसारी, कदीर सेठ, भुसावळ शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, रामभाऊ माळी, साबीर कुरेशी यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.










