यावल तालुक्यातील शेती साहित्य चोरी करणार्‍यांवर कारवाईची मागणी


यावल : यावल तालुक्यातील ग्रामीण भागात शेत-शिवारातून मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांच्या शेती साहित्याची चोरी होत असल्याने भुरट्या चोरट्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रयत शेतकरी संघटनच्या वतीने करण्यात आली. याबाबत यावल पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

पोलिस प्रशासनाला निवेदन
यावल पोलिस ठाण्यात रयत शेतकरी संघटनचे जिल्हा कार्याध्यक्ष रमजान पिंजारी यांनी निवेदन दिले असून त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील विविध शेती साहित्य सातत्याने चोरीला जात आहे. अन्नदात्या शेतकर्‍यांच्या शेती अवजारांच्या चोरीच्या प्रमाणात खूप मोठया प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यात शेतातील विहिरीत लावलेल्या विद्युत पंपाच्या केबल वायरी, स्टार्टर व पाईप सारख्या साहित्यांचा समावेश आहे. भुरट्या चोर्‍यांना आळा घालण्याकरीता पोलिसांची रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर रमजान पिंजारीसह किशोर ठाकुर, सुधाकर चौधरी, मनोज चौधरी, रमेश पाटील, शालीग्राम राणे, योगेश पाटील, भुषण पाटील, खेमचंद महाजन, जब्बार तडवीसह आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !