भुसावळात उघड्यावर गांजा सेवन : संशयितावर पोलिसांची कारवाई
Consumption of ganja in the open in Bhusawal : Police action against the suspect भुसावळ : शहरातील जाम मोहल्ला भागात गांजा ओढणार्या एकावर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
जाम मोहल्ला भागातील हॉटेल शालिमार हॉटेलच्या मोकळ्या जागेवर संशयित शेख शाबुद्दीन शेख मोयोद्दीन (55, जाम मोहल्ला, भुसावळ) हा सोमवार, 30 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चिलमद्वारे गांजा ओढताना आढळून आल्याने त्याच्याविरोधात कॉन्स्टेबल सचिन यशवंत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार तेजस निंबाजी पारीस्कर करीत आहेत.

