आंदोलनात 12 कोटींच्या सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान : 168 आरोपींना अटक : पोलिस महासंचालक रजनीश शेठ


मुंबई : राज्यभरात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. राज्यात आतापर्यंत अंदाजे 12 कोटींचे सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना दिली. आत्तापर्यंत 168 जणांना पोलिसांनी अटक केल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 54 गुन्हे दाखल करण्यात असून कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई केली जात असल्याचे ते म्हणाले.

कायदा हातात घेणार्‍यांवर कारवाई
महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितले की, हिंसाचार घडलेल्या भागात आता शांतता असून जेथे मराठा आंदोलन शांततेत सुरू आहेत तेथे त्यांना पोलिसांकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल मात्र कायदा हातात जेथे घेतला जाईल तेथे कडक कारवाई केली जाईल.

ज्या जिल्ह्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्या ठिकाणी आम्ही शांतता ठेवण्यासाठी संचारबंदी लागू केली असून अशा जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त पोलिस फोर्स देखील तैनात करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !