भुसावळ शहरातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Bhusawal city भुसावळ : शहरातील भोळे कॉलनीतून चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याची घटना 25 ऑक्टोबर रोजी रात्री 8.30 ते 10.45 दरम्यान घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
मनोज भास्कर पाटील (42, अलंकार बिल्डींग, भोळे कॉलनी, टेक्नीकल हायस्कूलमागे, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी 25 हजार रुपये किंमतीची दुचाकी दुचाकी (एम.एच.19 बी.के.7653) ही भोळे कॉलनीतील जयश्री न्याती यांच्या घराजवळ लावली होती मात्र काही वेळातच चोरट्यांनी संधी साधली. तपास पोलिस निरीक्षक गजानन पडघण यांच्या मार्गदर्शनाखाली जाकीर मन्सुरी करीत आहेत.








