वरणगावसह फुलगावातील तरुणांचा भीषण अपघातात मृत्यू : दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा


Youth of Varangaon and Phulgaon die in horrific accident : Crime against two-wheeler भुसावळ  : दुचाकींमध्ये समोरा-समोर जोरदार धडक होवून झालेल्या अपघातात वरणगावसह फुलगावातील दोघांचा मृत्यू झाला. फुलगाव फाट्याजवळ दोन दुचाकींची बुधवारी रात्री उशीरा धडक झाली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात मयत दुचाकीस्वाराविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. विजय रामकृष्ण महाजन (47, रा.फुलगाव) व ललित धांडे (35, रा.वरणगाव) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

रात्रीच्या सुमारास अपघात
बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फुलगाव फाट्याजवळ धांडे यांच्या दुचाकी (एम.एच.19 एएक्स 9181) ने महाजन यांच्या विना क्रमांकांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने उपचारादरम्यान विजय रामकृष्ण महाजन (47, रा.फुलगाव) व ललित धांडे (35, रा.वरणगाव) यांचा वरणगाव ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आल्याने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अपघात प्रकरणी
मयताचा भाऊ भूषण महाजन (फुलगाव) यांच्या फिर्यादीवरून मयत धांडे यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !