भुसावळ ऑर्डनन्समधील साखळी उपोषणाची सांगता


End of chain hunger strike in Bhusawal Ordnance भुसावळ : भुसावळ आयुध निर्माणीतील कामगार युनियन, मजदुर युनियन, बहुजन युनियन तसेच एस.सी.एस.टी., ओबीसी असो व स्टाफची सिड्रा यांच्या संयुक्त संघर्ष समितीद्वारे कामगारांच्या मागण्यांसाठी सोमवार, 20 सप्टेंबरपासून सुरू असलेले साखळी उपोषण जे जॉब रेट रिव्हीजन, पीएलआय स्कीम या प्रमुख मागण्या स्थानिक स्तरावरील नसल्याने व अन्य स्थानिक मागण्यावर कारवाई करण्याचे आदेश व आश्वासन मिळाल्याने 32 व्या दिवशी प्रशासनाच्या मध्यस्थीने सोडण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रशासनातर्फे संयुक्त महाप्रबंधक रघुनंदन झा, विभागीय महाप्रबंधक मुजुमदार व प्लॅनिंग अनुभाग प्रमुख एस.आर.पाटील उपोषणस्थळी उपस्थित होते. त्यांच्यातर्फे उपोषणकर्ते विनोद तायडे, राजकिरण निकम, किशोर रील यांना रसपान देवून उपोषणाची सांगता झाली. उपोषणस्थळी दिनेश राजगिरे यांनी मागण्यांबाबत व प्रशासनाशी चर्चा केली. दिवाळी सण, सुट्या असल्याने तसेच प्रमुख मागण्या या वरीष्ठ स्तरावरील असल्याने याबाबत प्रादेशिक कामगार आयुक्तांना मध्यस्ती करण्याचा निर्णयासह भविष्यात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्णय संयुक्त समितीने घेतला आहे. हे प्रथम सत्रातील आंदोलन तूर्त स्थगित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा दुसर्‍या सत्रात आंदोलनाचा इशारा दिला आहे. किशोर चौधरी, एम.डी.वानखेडे, नितेश तायडे यांनी आंदोलन सफलतेसाठी कामगारांना व साखळी उपोषणातील सहभागी कामगारांचे कौतुक केले.







32 दिवसीय आंदोलन यशस्वितेसाठी निलेश देशमुख, किशोर बढे, एम.एस.राऊत, प्रकाश नेमाडे, संजय अहिरे, राहुल पाटील, प्रमोद तायडे, सूर्यभान गाढे यांच्या नेतृत्वात आशिष मोरे, मोहन सपकाळे, जितू आंबेडकर, निलेश पाटील, चेतन चौधरीसह सर्व संयुक्त संघर्ष समिती सभासदांनी परीश्रम घेतले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !