भुसावळ शहरात आज केक स्टुडिओचा शुभारंभ
Inauguration of cake studio in Bhusawal city tomorrow भुसावळ : अस्सल खवैय्यांच्या जीभेचे लाड पुरवण्यासाठी शहरात डि क्रिओलो बेकर्सच्या सौजन्याने केक स्टुडिओचा शनिवार, 4 रोजी सकाळी सायंकाळी सहा वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात शुभारंभ होत आहे. भुसावळचे आमदार संजय सावकारे व भुसावळ शहर व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राध्येश्याम लाहोटी यांची प्रसंगी उपस्थिती असेल.
बेकरी प्रोडक्टसह सर्व काही एकाच छताखाली
भुसावळातील खवैय्या ग्राहकांच्या जिभेचे लाड पुरवण्यासाठी केक स्टुडिओमध्ये बेकरी प्रोडक्टस चॉकलेटस केक, स्नॅस, फ्रुट केकस उपलब्ध करून देण्यात आले आहेत शिवाय वरील सर्व प्रकारात विविध व्हरायटीदेखील उपलब्ध असल्याचे केक स्टुडिओचे संचालक शशिकांत मेहता म्हणाले.






केक स्टुडिओमध्ये विविध प्रकारचे केकस, पेस्ट्री, मफीन्स, कप केकस, टोस्ट, खारी, कुकीज, डिझाईनर केक, डोनटस फ्रेश स्वरूपात उपलब्ध असणार आहेत. भुसावळकरांनी एक वेळ सेवेची संधी द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केक स्टुडिओचा उद्या शुभारंभ
शहरातील तापी रोडवरील काशीनाथ लॉज खाली शनिवार, 4 रोजी सायंकाळी सहा वाजता केक स्टुडिओचा शुभारंभ होत आहे. उपस्थितीचे आवाहन शशिकांत मेहता, चारूलता शशिकांत मेहता, कपिल मेहता, विधी मेहता, युवराज मेहता, कुंजीका मेहता व मेहता परीवाराने केले आहे.


