यावल तालुक्यातील 134 जि.प.शाळांची न्यायाधीशांच्या पथकाकडून तपासणी

विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणार्‍या सुविधांची जाणली माहिती : शासनाला जाणार गोपनीय अहवाल


Inspection of 134 district schools in Yaval taluka by a team of judges यावल : यावल तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या शाळांची सध्याची स्थिती काय ? याबाबत न्यायाधीशांच्या एका विशेष पथकाने गेल्या तीन दिवसात 134 शाळांची तपासणी केली. विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, स्वच्छतागृह व शैक्षणिक प्रगती याबाबतची तपासणी या पथकाकडून करण्यात आली. त्याचा गोपनीय अहवाल शासनाकडे पाठवला जाणार आहे

राज्याकडून शाळांचे ऑडीट
राज्य शासनाकडून शिक्षण विभागाचे ऑडिट सुरू आहे. यामध्ये यावल तालुक्यातील जिल्हा परीषदेच्या विविध शाळांची तपासणी न्यायाधीश यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकारी अशा पथकाकडून केले जात आहे. यावल तालुक्यातील एकूण 134 शाळा या पथकाकडून तपासण्या आल्या आहेत. या शाळा तपासणीसाठी न्या.एस.के.सूर, प्रांताधिकारी कैलास कडलग, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, नायब तहसीलदार रशीद तडवी यांच्या उपस्थित या तपासण्या करण्यात आल्या.







जिल्हा परीषद शाळेतील सद्यस्थितीत स्वच्छतागृह आहे का ? आहे तर कसे आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था वी विद्यार्थ्यांना विविध सुविधा दिल्या जात आहे किंवा नाही याबाबतची पाहणी करण्यात आली. त्याचप्रमाणे शैक्षणिक प्रगतीचा आढावादेखील या पथकाकडून घेण्यात आला. आता शासनाकडे पथकाकडून संपूर्ण तपासणीचा गोपनीय अहवाल पाठवला जाणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !