भुसावळात किरकोळ वादातून बंग्लोरच्या प्रवाशावर चाकूहल्ला
A commuter from Bangalore was stabbed over a petty dispute in Bhusawal भुसावळ : शहरात धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून 45 वर्षीय बंग्लोरच्या प्रवाशावर चाकूने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवार, 5 रोजी दुपारी साडेतीन वाजता रेल्वे स्थानकाबाहेर घडली. याप्रकरणी एकाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
धक्का लागल्याच्या वादातून मारला चाकू
लॉरेन्स अमीथाराज उमर (45, रूम क्रमांक 12, पहिला माळा, नेहरू रोड, स्टेट बँक ऑफ हैद्राबादजवळ, बंग्लोर, कर्नाटक) हे रविवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेपाच वाजता रेल्वे स्थानकाबाहेर उभे असताना त्यांचा धक्का 30 वर्षीय तरुणाला लागला. या कारणावरून तरुणाने वाद उपस्थित करीत आपल्या सोबत आणलेल्या छोट्या चाकूने उमर यांच्या छातीवर वार करीत दुखापत केली. याप्रकरणी उमर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात 29 ते 30 वर्षीय तरुणाविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.

