यावल तालुक्यात अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील बालकाचा मृतदेह आढळला
A partially decomposed body of a child was found in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात अर्धवट प्राण्यांनी खाल्लेल्ला नऊ महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळून आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली. यावल पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.
अनैतिक संबंधातून बाळ जन्माला आल्याचा संशय
यावल तालुक्यातील सातोद येथील इंदिरानगर परीसरात मंगळवार, 7 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचार्यांना या ठिकाणी पूर्ण नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्ध शरीर खाल्लेले बाळ मिळुन आले. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेवून मृत शरीराच्या बाळाला ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्मास आले असल्याचा कयास असून समाजात बदनामी होईल या भीतीपोटी या बाळास अशा प्रकारे जन्म दिल्यावर बेवारस सोडून दिल्याचा अंदाज आहे.


पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र पवार व पोलिसांनी घटनेशी संबधीत तपासाला सुरुवात केली. यावल पोलिसात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.