भुसावळात शहरात सार्वजनिक जागी दम मारो दम…. शहर पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या
Dum Maro Dum in a public place in Bhusawal city…. The city police shackled three people भुसावळ : सार्वजनिक जागी गांजा ओढणार्या तिघांविरोधात शहर पोलिसांनी कारवाई करीत गुन्हा दाखल केला. या कारवाईने सार्वजनिक जागी धुम्रपान तसेच गांजा ओढणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
तीन ठिकाणी कारवाई
राजू पूनमचंद यादव (50, हद्दीवाली चाळ, ह.मु.रेल्वे स्टेशन, भुसावळ) हा रेल्वे स्टेशन जवळील केला सायडींग परीसरात सोमवार, 6 रोजी 7.15 वाजता गांजा ओढताना आढळल्याने त्याच्याविरोधात नाईक समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


शुभम मदन पवार (21, धम्मनगर, भुसावळ) हा डी.एस.ग्राऊंडवर सोमवार, 6 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गांजा ओढत असताना त्यास पकडण्यात आले. याप्रकरणी हवालदार सुपडा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार विकास बाविस्कर करीत आहेत.
तिसर्या कारवाईत चेतन मदन पवार (19, धम्मनगर, भुसावळ) हा सोमवारी रात्री 9.20 वाजता तार ऑफिस रोडवर गांजा ओढताना आढळल्याने त्याच्याविरोधात हवालदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रज्जाक खान करीत आहेत.