सुसरी येथून दुचाकी लांबवली
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील सुसरी येथून चोरट्यांनी दहा हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
जितेंद्र शेनफडू पाटील (29, सुसरी, ता.भुसावळ) यांच्या मालकिची दुचाकी (एम.एच.19 सीसी 8249) ही घराबाहेर पार्क केली असताना चोरट्यांनी 5 ते 6 नोव्हेंबरदरम्यान चोरट्यांनी संधी साधली. सर्वत्र शोध धेवूनही दुचाकीचा शोध न लागल्याने वरणगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तपास हवालदार मनोहर पाटील करीत आहेत.

