भुसावळात रेल्वे आरक्षण तिकीटाची काळाबाजारी : एकाला अटक


Black market of railway reservation tickets in Bhusawal: One arrested भुसावळ : दिवाळी सणामुळे रेल्वे गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी वाढली आहे. वाढत्या गर्दीचा फायदा घेत ब्लॅकमध्ये तिकीटे विक्री करणारे दलालही सक्रिय झाल्याने अशांवर रेल्वे सुरक्षा बलाकडून कारवाई केली जात आहे. दक्षिण बाजूच्या आरक्षण खिडकीवर संशयित जाहिद अली इकबाल अली सय्यद (34, हाउस क्रमांक 820/2 बातुल मंजिल, जाम मोहल्ला, ईमलीपूरा, भुसावळ) यास पकडण्यात आले.

शंभर ते दोनशे रुपये जादा दराने तिकीटाची विक्री
संशयिताकडून महाराष्ट्र एक्स्प्रेसचे चार जणांचा प्रवास असलेले व एक हजार 580 रुपये किंमतीचे तिकीट जप्त करण्यात आले. दरमया, संशयित शंभर ते दोनशे रुपये अधिक घेवून प्रवाशांना तिकीटांची विक्री करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ही कारवाई सहाय्यक उपनिरीक्षक पी.के.दीक्षित व व्हिजीलन्स विभागाचे जितेंदर कुमार मिश्रा व त्यांच्या टीमने केली.
उपनिरीक्षक एन.के.सिंह अधिक तपास करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !