भुसावळातील हुडको कॉलनीत भर दिवसा धाडसी घरफोडी : एक लाख 10 हजारांचा ऐवज लंपास


Daring house burglary in Bhusawal’s Hudco Colony : 1 lakh 10 thousand instead of loot भुसावळ  : शहरातील नाहाटा चौफुलीजवळील हुडको कॉलनीत चोरट्यांनी भर दिवसा बंद घराला टार्गेट करीत एक लाख 10 हजारांच ऐवज लांबवला. दिवाळीच्या पर्वामुळे कुटूंब बाहेरगावी जात असल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांकडून साधली जात असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भर दुपारी बंद घर फोडले
जामनेर रोडवरील पु.ओ.नाहाटा चौफुलीजवळील हुडको कॉलनीत शिवदास दौलत पाटील (67, रा.04, हुडको कॉलनी, नाहाटा चौफुली, भुसावळ) हे सेवानिवृत्त कर्मचारी कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. पाटील कुटूंब दिवाळीच्या खरेदीसाठी साधत मंगळवारी सकाळी 11 वाजता बाहेर पडले व जाताना त्यांनी सेप्टी ग्रीलला कुलूप न लावता आतल्या दरवाजाला कुलूप लावले. ही संधी पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी साधली.



बंद घरांना चोरट्यांकडून टार्गेट
चोरट्यांनी दुपारी 12 ते दुपारी दोन दरम्यान मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा अलगद तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी 40 हजार रुपये किंमतीची व 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, 35 हजार रुपये किंमतीची व 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 10 हजार रुपये किंमतीचे व तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉप्स तसेच 25 हजारांची रोकड लांबवली. दुपारी दोन वाजेनंतर पाटील कुटूंब दिवाळीची खरेदी करून घरी परतले मात्र त्यांना सेप्टी ग्रील व मुख्य दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्यांनी घरात पाहणी केली असता सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे व गोदरेज कपाटातून महागडा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळवली.

पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व सहकार्‍यांनी धाव घेत पाहणी केली. तपास पोलिस हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !