फैजपूर येथे 28 वर्षीय महिलेचा विनयभंग : दाम्पत्याविरूध्द गुन्हा दाखल


28-year-old woman molested in Faizpur : A case has been registered against the couple यावल : फैजपूर शहरातील नम्रता नगरातील 28 वर्षीय महिलेस किरकोळ कारणावरून पती-पत्नीकडून मारहाण झाली व महिलेला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिचे कपडे फाडत तिच्या मनाला लज्जा उत्पन होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल
फैजपूर शहरातील नम्रता नगरातील 28 वर्षीय महिलेने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, याच भागातील रहिवासी संजय कमलाकर झांबरे व छाया झांबरे या दोघांनी महिलेला व तिच्या पतीला शिविगाळ करून मारहाण केली. महिलेचा पंजाबी ड्रेस फाडून तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात दोघांविरुद्ध विनयभंगासह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार रशीद तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !