पिंपळगावात शेत रस्त्याच्या वादातून तिघांना बेदम मारहाण : एक गंभीर


In Pimpalgaon, three were beaten up in a farm road dispute: one seriously भुसावळ : शेती वहिवाटीच्या रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारीत दोघे जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव बु.॥ येथे घडली. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
पिंपळगाव येथील शेतकरी विष्णू निवृत्ती तळेले व निवृत्ती जगन्नाथ पाटील यांचे करंजी शिवारात शेत आहे. या शेत गट क्रमांक 174/1 मधील शेत वहिवाटीच्या रस्त्याचा या दोघांमध्ये वाद सुरू आहे. हा वाद शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेताजवळ पुन्हा उफाळून आला व त्याचे रुपातंर हाणामारीत झाले. यामध्ये किरण जगन्नाथ पाटील, निवृत्ती जगन्नाथ पाटील व सविता किरण पाटील यांना विष्णू निवृत्ती तळेले, रामा विष्णू तळेले व रेखाबाई विष्णू तळेले यांनी शिवीगाळ करीत काठी व दगडाने बेदम मारहाण केली. यामध्ये किरण पाटील व विष्णू पाटील हे जखमी झाले असून त्यांच्यावर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.



हाणामारीत एक जण गंभीर
यापैकी एक जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले आहे. उर्वरीत दोघे किरकोळ जख्मी झाले आहेत. या हाणामारी प्रकरणी सविता पाटील यांनी वरणगांव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास वरणगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रमोद कंखरे तपास करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !