सांगवी बुद्रुक येथील शेत शिवारातून 28 हजारांच्या ठिबक नळ्या चोरीला
Drip tubes worth 28,000 were stolen from a farm in Sangvi Budruk यावल : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील शेतकर्यांच्या डोंगरकठोरा शेतशिवारातील शेतातील 500 मीटर लांबीच्या व 28 हजार किंमतीच्या ठिबक नळ्या अज्ञात चोरट्याने लांबवल्या. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शेती साहित्याच्या चोर्यांनी शेतकरी त्रस्त
सांगवी बुद्रुक, ता.यावल येथील शेतकरी किशोर प्रल्हाद पाटील यांचे डोंगरकठोरा शिवारात शेत आहे. त्यांच्या शेत गट क्रमांक 215 मध्ये त्यांनी 500 मीटर लांबीच्या ठिबक नळ्यांचे दहा बंडल ठेवले होते. 28 हजार रुपये किंमतीच्या या ठिबक नळ्यांचे बंडल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लांबवले. हा प्रकार सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चव्हाण करीत आहेत.

