हिंगोणा येथे रोहित्र पेटले : ग्रामस्थांच्या सतर्कतेने अनर्थ टळला


Rohitra caught fire at Hingona : Disaster was averted by vigilance of villagers यावल : यावल तालुक्यातील हिंगोणा येथील जंगले वाडा भागाजवळील विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्राला अचानक आग लागली व तेथे आगीचा विळखा होण्यास सुरुवात झाली.

आठवडे बाजार असल्यामुळे बाजारामध्ये रोहित्र जळाल्यामुळे एकच तारांबळ उडाली. या भागातील रहिवासी धीरज जंगले, मोहन जंगलेसह नागरीकांनी महावितरण विभागास माहिती दिली व गावातील विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. आग तातडीने विझवण्यात आली परीणामी मोठी दुर्घटना टळली. या आगीत रोहित्रावरील तांत्रिक दोष दर करून गावात पुन्हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !