डांभूर्णीतील तरुणाने दिवाळी सणालाच उचलले टोकाचे पाऊल ; गावकरी हळहळले
A youth from Dambhurni took the extreme step on the occasion of Diwali ; The villagers gasped यावल : यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे 30 वर्षीय तरुणाने आपल्या घराच्या मागे असलेल्या शेतात शेत बांधावरील झाडाच्या फांदीला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. किसन माणिक कंडारे (30) असे मयताचे नाव आहे.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
किसन या तरुणाने रविवारी सकाळी आपल्या घरी असताना घरामागील प्रकाश भिरूड यांच्या शेतातील झाडाच्या फांदीला दोरीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याला तातडीने तेथून यावल ग्रामीण रूग्णालयामध्ये आणण्यात आले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात माणिक मंगल कंडारे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश महाजन करीत आहे.

