गुरांची अवैध वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा


खिर्डी : गुरांची अवैध वाहतूक केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध निंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 7 रोजी दुपारी 12 वाजता टाटा कंपनीच्या छोटा हत्ती वाहनात (एम.एच.20 डी.ई 1656) गुरे कोंबून त्यांची बलवाडी गावातून होत असताना निंभोरा पोलिसांनी वाहन अडवले. वाहनातील 45 हजार रुपये किंमतीच्या तीन बैलांची निदर्यतेने वाहतूक होत असल्याने वाहन चालक अर्जुन बाळू महाजन (बक्षीपूर) व शेख आक्षहफ शेख अमानुल्ला (37, रा.रसलपुर) यांना अटक करण्यात आली. ही कारवाई हवालदार राजू कुमावत, विजय चव्हाण, राकेश वराडे, ईश्वर चव्हाण आदींनी केली. ईश्वर जुलालसिंग चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक महेश जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजू कुमावत करीत आहेत. दरम्यान, त्या तिघा बैलांची गो शाळेत रवानगी करण्यात आली. दरम्यान, अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणार्‍यांवर कठोर कारवाईची मागणी खिर्डीतील श्रीकृष्ण मंदिराचे मठाधिपती प्रदीप महाराज, पवन चौधरी, तेजस महाजन, प्रभाकर महाजन, सागर पाटील, बजरंग दल तालुका संयोजक अक्षय पाटील, अ‍ॅड.कालिदास ठाकुर, धीरज भंगाळे, राकेश भिरुड, अभय गवळी, शुभम महाजन, कैलास पाटील, व्यंकटेश बोरोले, गिरीश भारंबे संकेत पाटील, रीतेश चौधरी यांनी मागणी केली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !