ऐनपूरच्या तरुणाचा डोक्यात धारदार शस्त्र मारून खून
A young man of Ainpur was killed by hitting his head with a sharp weapon रावेर : ऐनपूर येथील 30 वर्षीय तरुणाचा निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील शेतात अज्ञातांनी खून केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. निंभोरा पोलिसांना खुनाची माहिती कळताच त्यांनी धाव घेत तपासाला वेग दिला आहे. शेख अफजल शेख असलम (30, ऐनपूर, ता. रावेर) असे मयताचे नाव आहे.
शेतात आढळला मृतदेह
शेख अफजल या तरुणाचा मृतदेह निंबोल-ऐनपूर रस्त्यावरील एका शेतात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास सापडला. शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणार्या तरुणाचा नेमका खुन कुणी व कोणत्या कारणासाठी केला? याची माहिती कळू शकली नाही. डोक्यात दगड वा धारदार शस्त्र मारल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे तर शवविच्छेदन अहवालानंतर नेमका प्रकार समोर येणार आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश धुमाळ व सहकार्यांसह जळगावहून फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

