आडगावजवळ मनुदेवी रस्त्यावर अज्ञाताने ट्रॅक्टरचे टायर जाळले
An unknown person burnt the tires of a tractor on Manudevi road near Adgaon यावल : यावल तालुक्यातील आडगाव येथे मनुदेवी रस्त्यालगत असलेल्या शेतामधील गोडावून समोर लावलेल्या ट्रॅक्टरचे टायर अज्ञात माथेफिरूने पेटवले. या घटनेत सुमारे 20 हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी यावल पोलिसात ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
आडगाव येथे मनुदेवी रस्त्यालगत अनिल मधुकर पाटील या शेतकर्याचे शेत आहे. या शेतातील गोदामाबाहेर त्यांनी ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच.19 सी. झेड. 1498) हे लावले असता डाव्या बाजूचे टायर अज्ञात व्यक्तीने पेटवत जाळून टाकले. यात 20 हजारांचे नुकसान झाले. हा प्रकार हा निदर्शनास आल्यानंतर यावल पोलिसात अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.

