मारुळच्या 26 वर्षीय विवाहितेचा छळ : 11 जणांविरोधात गुन्हा
Harassment of Marul’s 26-year-old married woman : Case against 11 persons यावल : यावल तालुक्यातील मारूळ येथील माहेर असलेल्या एका 26 वर्षीय विवाहितेचा माहेरून आंधन न आणल्याने तसेच लग्नात पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी न दिल्याने व दिराला नोकरीसाठी पैसे न आणल्याने 11 जणांनी तिचा छळ केला. याप्रकरणी फैजपूर पोलिसात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मारूळ, ता.यावल येथील माहेर असलेल्या जयश्री निलेश मोरे (26) या विवाहितेने फैजपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह निलेश शेखर मोरे (मनमाड) यांच्यासोबत झाला होता.
11 जणांविरोधात गुन्हा दाखल
विवाहानंतर पती निलेश मोरे, कल्पना मोरे, अजय मोरे, विजय मोरे (सर्व राहणार पंचवटी कॉलनी, मनमाड) तसेच धनराज तायडे, सुमित बाविस्कर, रेखा बाविस्कर, छाया तायडे, कविता मोरे, पंडित बोदडे, अक्षय बोदडे (साखरी फाटा, भुसावळ) या 11 जणांनी तिचा तू लग्नात आंधन आणले नाही, लग्नात पाच ग्रॅमची सोन्याची अंगठी दिली नाही तसेच दिरास नोकरीसाठी पैसे आणले नाही याकरीता तिचा छळ केला. या सर्व 11 जणांविरुद्ध फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेश बर्हाटे करीत आहे.


