बंगळूरमध्ये पावणेतीन कोटींची चोरी करीत नेपाळ पसार होणार्या भामट्याला रावेरात बेड्या
भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमध्ये कारवाई : फोटोवरून पटली ओळख
Bhamtya, who spread to Nepal after stealing Rs 3 crore in Bangalore, was arrested भुसावळ : महालक्ष्मीपुरम बंगलोर येथे घरात धाडसी दरोडा टाकून तब्बत साडे पाच किलो सोने व रोकड मिळून 2 कोटी 78 लाख 95 हजार रुपयांचा डल्ला मारून गोरखपूरमार्गे नेपाळ पसार होणार्या कुविख्यात दरोडेखोराला भुसावळातील सतर्कत रेल्वे सुरक्षा बलाने एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसच्या ए-1 या डब्यातून रावेरात अटक केली. संशयीताला बंगलोर पोलिसांच्या ताब्यात शुक्रवारी सकाळी आरपीएफने स्वाधीन केले. संशयीताकडे तीन हजार 900 रुपयांचे नेपाळी चलन व भारतीय चलनाचे 14 हजार रुपये जप्त करण्यात आले.उपेंद्र प्रदीप शाही (35, रा.पनाथूर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगलोर) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात नऊ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
याबाबत आरपीएफ निरीक्षक आर.के.मीना यांच्या माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त एच. श्रीनिवास राव यांनी माहिती दिली की, महालक्ष्मीपुरम बंगलोर येथे संशयित उपेंद्र शाही व त्याच्या साथीदारांनी मोठा दरोडा टाका असून त्यातील मुख्य संशयित एलटीटी-गोरखपूर या गाडीने जात आहे. ही गाडी गुरूवार, 16 रात्री 10.55 वाजता भुसावळ जंक्शनवरील प्लॅटफॉर्म 5 वर आली असता, आरपीएफ निरीक्षक मीना व त्यांचे सहकारी उपनिरीक्षक के.आर.तरड, उपनिरीक्षक एन.के. सिंग, उपनिरीक्षक सुभाष राजपूत आणि कर्मचारी यांनी गाडीची तपासणी केली मात्र संशयीत गवसला नाही, यामुळे निरीक्षक मीना यांनी अधिकारी, कर्मचारी यांचे चार जणांचे पथक धावत्या गाडीत पाठविले. गाडीची तपासणी करीत असतांना संशयीत ए-1 या डब्यात बसलेला आरपीएफला दिसला. आरपीएफजवळ असलेल्या फोटो व संशयीत एकच असल्याची खात्री झाल्यावर गाडी रावेर स्थानकावर थांबल्यावर संशयीताच्या मुसक्या आवळण्यात आल्या. पथकातील उपनिरीक्षक के.आर.तरड, महेंद्र कुशवाह, के.एस.वसावे, विनोद कुमार आणि ए.ए.हंसराज वर्मा यांनी अन्य गाडीने संशयिताला भुसावळात आणले.


मास्टर माइंडची दिली माहिती
बंगलोरमध्ये केलेल्या चोरीतील संशयीत हा चोरीतील मास्टर माइंड आहे. हा बंगलोर येथून मुंबईत आला, तेथे चोरीतील मालाची वाटणी करून तो गोरखपूर गाडीने बसला. त्याला पकडल्यावर याबाबतची माहिती निरीक्षक मीना यांनी महालक्ष्मी लेआउट पोलिस स्टेशन बंगलोर सिटीचे निरीक्षक एच.ए.मंजू यांना फोनवरून दिली. त्यामुळे बंगलोर येथून पथक भुसावळला येत त्यांनी संशयीताचा ताबा घेतला.
सोन्यासह रोकडची विल्हेवाट
संशयीत उपेंद्र प्रदीप शाही (35, रा.पनाथूर, मेन रोड, शोभा ड्रीम इकर, बंगलोर) असे त्याचे नाव आहे. बंगलाोर येथून चोरी करून पसार झालेल्या शाही याच्या सोबतच्या तीन ते चार चोरट्यांनी चोरीतील माल आपसात वाटून घेतला. संशयिताजवळ केवळ 14 हजार 150 रुपये आणि तीनहजार 900 रुपयांचे नेपाळी चलन मिळाले. संशयीताला अटक केल्यावर त्याच्याजवळ सोने मिळाले नाही, त्याने सूरत येथे सोने दिल्याचे सांगण्यात आले. पोलिस त्या दिशेने तपास करीत आहे.
संशयीताविरूध्द 10 गुन्हे
भुसावळ आरपीएफने पकडलेल्या संशयीत शाही याच्या विरूध्द मुंबई, बंगलोर, मंगळूर, सूरत, वर्सोवा, कोसंबा (सूरत), अप्पर पेठ, वाशी, कुकटपल्ली येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे सूत्रांनी सांगितले.
