पोलिस भरती प्रक्रियेत ब्लूटूथद्वारे कॉपी : परप्रांतीयांविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा

0

Copying through bluetooth in police recruitment process : Crime against foreigners in Dharangaon police धरणगाव : दिल्ली पोलिस कॉन्स्टेबल पोलिस भरतीसाठी आलेल्या हरीयाणातील दोन परीक्षार्थींनी ब्लूटूथद्वारे गैरप्रकार केल्याचा प्रकार धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईटेक्नाबाईट येथील परीक्षा केंद्रात गुरूवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता समोर आला. याप्रकरणी दुपारी चार वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

सतर्कतेने टळला गैरप्रकार
दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल महिला व पुरुष भरतीसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन वेस्टर्न यांच्यावतीने ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या अनुषंगाने धरणगाव तालुक्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील साईटेक्नाबाईट येथील परीक्षा केंद्रात ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी हरीयाणा राज्यातून आलेल्या आशिष कुलदीप दहिया (मोहम्मदाबाद, जि.सोनपत) आणि दीपक जोगिंदरसिंह (रा.हिसार हरीयाणा) हे देखील ऑनलाईन परीक्षा देण्यासाठी आले होते. गुरुवार, 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास परीक्षा हॉलमध्ये परीक्षा देत असतांना आशिष दहिया आणि दीपक जोगिंदरसिंह यांनी कानात पिवळसर व काळा पट्टा असलेल्या ब्लूटूथ डिवाइस घालून परीक्षेत कॉपी केल्याचा प्रकार समोर आला.

या संदर्भात सचिन अशोक पाटील (खोटेनगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उद्धव ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहेत.


कॉपी करू नका.