वाघोदेनजीक खाजगी ट्रॅव्हल्स पेटली : सुदैवाने बचावले प्रवासी
Private Travels near Waghoden caught fire : Passengers luckily saved सावदा : रावेर येथून पुण्याकडे प्रवासी घेऊन निघालेल्या खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सला शनिवार, 18 रोजी रावेर ते सावदा दरम्यान वडगाव ते वाघोदादरम्यान अचानक आग लागली. पाहता-पाहता आगीचा विळखा वाढला मात्र सुदैवाने वेळीच प्रवासी बस बाहेर आल्याने प्राणहानी टळली. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
आगीचे कारण अस्पष्ट
साई सिद्धी ट्रॅव्हल्स क्रमांक (एम.एच.40 एन.5361) ही रावेरहुन पुण्याकडे प्रवासी घेऊन शनिवार, 18 रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान निघाली असता रावेर सोडल्यावर काही वेळात वडगाव-वाघोदा दरम्यान बसमधून धूर बाहेर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली व वेळीच प्रवासी पटापट बसबाहेर आल्यानंतर सुखरूप बाहेर पडले व लागलीच या ट्रॅव्हल्सला मोठ्या आगीने घेरले. यात संपूर्ण ट्रॅव्हल्स जाळून खाक झाली.


परतीच्या प्रवासात वाढली गर्दी
दरम्यान या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अनेक प्रवाशांचे महागडे सामान जळून खाक झाले. सावदा व रावेर येथील अग्निशमन दलाचे बंबांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दिवाळी निमित्ताने खाजगी ट्रॅव्हल्सला मोठी गर्दी वाढली असून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी करून हे ट्रॅव्हल चालक प्रवाश्यांया जीविताची काळजी न करता नियमबाह्य प्रवासी वाहतूक करीत असताना परीवहन विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप आहे.
